मुंबई : ऋतुजा लटकेंना हायकोर्टाचा दिलासा, उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करण्याचे आदेश

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. या परिस्थितीत आम्हाला हस्तक्षेप करणं भाग आहे. उद्या 11 वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करण्याचे आदेश हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने राजीनामा प्रकरणी ऋतुजा लटके यांना दिलासा दिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शिवसेना शाखा क्रमांक 79 या ठिकाणी शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू असून उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या ठिकाणी फटाके फोडून मिळण्याचे स्वागत देखील करण्यात आले आहे.

ऋतुजा लटके यांनी 3 ऑक्टोबरला तातडीने राजीनामा स्वीकारावा असा अर्ज केला होता. महापालिका आयुक्त हे विशेष प्रकरणात राजीनामा अर्ज स्वीकारू शकतात. मात्र हे प्रकरण नियमाला धरून नाही, असा युक्तीवाद महापालिकेच्या वकिलांनी केला.

आयुक्तांनी नोटीस कालावधी माफ करण्याचा आपला विशेषाधिकार विशिष्ट पद्धतीने वापरावा, असे हायकोर्ट सांगू शकत नाही. जोपर्यंत राजीनामा स्वीकारला जात नाही तोपर्यंत कर्मचारी पालिकेच्या सेवेतच असतो. एक महिना नोटीसच्या कालावधीतही आयुक्तांना निर्णय घेण्याचा अधिकार असतो, असाही युक्तीवाद पालिकेच्या वकिलांनी केली.

माझा राजीनामा विशिष्ट तारखेला किंवा विशिष्ट दिवसांत स्वीकारावा, असे म्हणण्याचा कर्मचाऱ्याला अधिकार नाही. तो कधी स्वीकारायचा हा अधिकार नोकरी देणाऱ्याचा असतो. अशा प्रकरणात कोर्टालाही आदेश देण्याचा अधिकार नसतो, असा पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी युक्तिवाद केला.

केवळ राजकीय दबावापोटी हे सर्व सुरु आहे. नियमानुसार आमची प्रक्रिया योग्य आहे. लटकेंविरोधात जी तक्रार झाली आहे ती एक दिवस आधी झाली आहे. त्यातील तक्रारदार हा अंधेरीचाच आहे. तर वकील हा पनवेलचा आहे हे कसं शक्य आहे. त्यामुळे हे जाणूनबुजून केलं जातंय, असा युक्तीवाद लटकेंच्या वकिलांना मांडला आहे.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *