मुंबई : अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी व्यावसायिकाला अटक; ओशिवरा पोलिसांची कारवाई

मुंबई : ओशिवरा पोलिसांच्या विशेष पथकाने बॉलीवूड कोरिओग्राफर आणि अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी लुकआउट नोटीसवर असलेल्या एका व्यावसायिकाला अटक केली आहे. रोहित कपूर उर्फ ​​रितेश केशवानी असे अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव असून तो मूळचा छत्तीसगडचा आहे.

रोहितवर याच्यावर ओशिवरा मालवणी, नवसारी आणि दिडोंशी पोलीस ठाण्यात महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवणी आणि दिडोंशी पोलिसांनी त्याला याआधी देखील अटक केली होती. मात्र, तेव्हा त्याची जामिनावर सुटका झाली होती. जामिनावर असताना आरोपी वारंवार गैरकृत्य करत राहिला. त्यानुसार त्याच्यावर नुकताच एक गुन्हा दाखल केला होता.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अटकेच्या भीतीने तो श्रीलंकेला पळून जात असताना ओशिवरा पोलिसांनी त्याला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. ओशिवरा परिसरात राहणाऱ्या ४८ वर्षीय कोरिओग्राफर आणि अभिनेत्रीच्या तक्रारीवरून रोहितविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply