मुंबई : अनिल देशमख यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; जामिनाचा मार्ग मोकळा, सीबीआयची याचिका फेटाळली

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमख यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयची याचिका फेटाळली आहे.

अनिल देशमुखांच्या जामिनाविरोधात सीबीआयने हायकोर्टात धाव घेतली होती. अनिल देशमुख यांना 12 डिसेंबरला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर सीबीआयने हायकोर्टात धाव घेतल दहा दिवसांची स्थगितीची विनंती केली होती.

न्यायालयाने ती विनंती मान्य केली. ती मुदत संपत असताना सीबीआयने पुन्हा एकदा 27 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ मिळावी अशी विनंती केली होती. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी सीबीआयची ही विनंती स्वीकारली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांचा जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयात अपिलासाठी दिलेला कालावधी आज संपला होता. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना सीबीआयला सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी दिला होता. तो कालावधी आज 27 डिसेंबरला संपला.

सर्वोच्च न्यायालयाला सध्या नाताळाच्या सुट्ट्या असल्यानं अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आज अनिल देशमुख यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान आज जर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला तर नागपूर इथं सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात अनिल देशमुख सहभागी होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.

अँटेलिया स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे या पोलिस कर्मचाऱ्याने अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपानंतर गृहमंत्री पदावर असलेल्या अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून ते या प्रकरणात अटकेत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply