मुंबई : अखेर तीन रेल्वे स्थानकांमधील विद्युत वाहन चार्जिंग सेवा बंद;अल्प प्रतिसाद आणि उदासिन कंत्राटदारामुळे निर्णय

मुंबई : विजेवर धावणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध व्हावी आणि त्याद्वारे उत्पन्न मिळावे ही बाब विचारात घेऊन मध्य रेल्वेने रेल्वे स्थानकांच्या आवारात चार्जिंग सुविधा सुरू केली होती. मात्र या सेवेला ग्राहकांकडून मिळणारा अल्प प्रतिसाद आणि कंत्राटदाराची उदासीनता यामुळे परेल, दादर आणि भायखळा रेल्वे स्थानकांच्या हद्दीतील विद्युत वाहन चार्जिंग सुविधा बंद करण्यात आली आहे.

वायू आणि ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी केंद्र सरकार विद्युत वाहनविषयक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या वाहनांचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी राज्य सरकारकडून अनुदानही दिले जात आहे. परंतु विद्युत वाहनाच्या चार्जिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबई व परिसरात अद्यापही या वाहनांसाठी चार्जिंगची पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे रेल्वेच्या हद्दीतील मोकळ्या जागेत विद्युत वाहनांसाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, कुर्ला आणि भांडुप रेल्वे स्थानकांच्या हद्दीत चारचाकी विद्युत वाहनांसाठी सशुल्क चार्जिंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या प्रत्येक स्थानकात दररोज सरासरी दोन ते चार वाहने चार्जिंगसाठी येतात. मध्य रेल्वेने जानेवारी २०२२ मध्ये परेल, भायखळा आणि दादर रेल्वे स्थानकांच्या हद्दीत ही सुविधा उपलब्ध केली होती. मात्र ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कंत्राटदाराने या कामातून काढता पाय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या स्थानकात पुन्हा विद्युत वाहन चार्जिंग सुविधा पुन्हा सुरू करण्याचा कोणताही विचार नाही. मध्य रेल्वेकडून टिटवाळा आणि मानखुर्द या ठिकाणीही अशी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र अद्याप त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply