मुंबईत फॅशन स्ट्रीट भागात भीषण आग; अग्निशमन दलाच्या सहा गाड्या दाखल

मुंबईतील चर्चगेटजवळील फॅशन स्ट्रीटवरच्या दुकानांना आज (शनिवार) दुपारी एक वाजेच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आणि कर्मचारी यांच्यासह स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले.

या घटनेत काही दुकानामधील साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थली दाखल झाल्यानंतर काही कालावधीतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले.

Follow us -

आग कोणत्या कारणाने लागली, याचा शोध सुरू आहे, अशी माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. तर घटनास्थळी मोठ्याप्रमाणावर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply