मुंबईत नववर्षात जमावबंदीचे आदेश? विश्वास नांगरे पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई पोलिसांनी सीआरपीसी १४४ अंतर्गत जमावबंदीचे आदेश दिल्याची बातमी शहरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्यामुळे मुंबईकर नागरिकांमध्ये जमावबंदीच्या आदेशावरून गैरसमज निर्माण झाले आहेत. जमावबंदीच्या आदेशावरून पसरलेल्या बातमीवर मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी २ जानेवारीपर्यंतचे जमावबंदीचे आदेश अफवा असल्याचे सांगितलं आहे. विश्वास नांगरे पाटील म्हणाले, 'मुंबई पोलिसांनी सीआरपीसी १४४ अंतर्गत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत, अशा आशयाची बातमी चुकीची आणि गैरसमज निर्माण करणारी आहे. हे रुटीन आदेश असतात'.

'मुंबई शहरात मुंबई पोलिसांकडून मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) ३ अन्वये जे लोक मोर्चे, निर्देशने काढतात, जे लोक कायदा आणि सुव्यवस्थेस बाधा निर्माण करू शकतात. त्यांच्याविरुद्ध आदेश दर १५ दिवसाला काढले जातात. वर्षातले ३६५ पैकी ३४१ दिवस हे आदेश काढले जातात. या आदेशाचा सर्व सामान्यांशी काहीही संबध नाही. या आदेशातून पारिवारीक व कौटुंबिक मनोरंजनाचे आदेश वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे या आदेशाबाबत संम्रभ निर्माण करून घेऊ नये. याबाबत माध्यमांनी देखील व्यवस्थित बातम्या द्यावात, अशी विनंती नांगरे पाटील यांनी दिली.

दरम्यान, काल मुंबईत २ जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे लाऊडस्पीकर गाणे, वाद्ये वाजवणे, फटाके फोडणे इत्यादी यावर निर्बंध इत्यादी आदेशात नमूद करण्यात आलं होतं. मात्र, या आदेशाबाबत मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील स्पष्टीकरण दिलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply