मुंढवा-कोरेगाव पार्क रस्त्यावरील वाहतुक तासन् तास ठप्प !

मुंढवा : कोरेगाव पार्क नॉर्थ मेन रोड ते मुंढवा येथील महाराजा सयाजीराव गायकवाड चौकादरम्यान सकाळपासूनच तासन तास वाहतुक ठप्प झाली होती. या रस्त्यावर होळीनिमित्त चार ठिकाणी मोठे कार्यक्रम होते. त्याला सर्वच खात्यांकडून परवानगी दिल्याने या रस्त्यावर तरूण-तरूणींच्या गाड्या तसेच नेहमी जाणारे, चारचाकी, दुचाकी, टेम्पो, रिक्षा व जड वाहने यांची एकच गर्दी उसळली होती. त्यामुळे कोंडी होवून दोन्ही बाजूला वाहनांच्या दिड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती. मुंढवा हद्दीत चार ठिकाणी कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली होती. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात येणाऱ्या तरूणांच्या वाहनांची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या कार्यक्रमाला आलेल्यांच्या दुचाकी, चारचाकी रस्त्यावरच उभ्या केल्या होत्या.त्यामुळे कोरेगाव पार्क साऊथमेन रस्त्यावर जर्मन बेकरी ते कल्याणीपुल व कल्याणी पुल ते मुंढवा चौकापर्यंत सुमारे दिड किलोमीटरपर्यंत वाहने एकाच जागेवर बराच काळ अडकून पडली होती. त्यामुळे कार्यक्रमाव्यतिरिक्त चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागला होता. या रस्त्यावर वाहतुक विभागाचे कल्याणी पुल चौकात चार कर्मचारी दिसून आले. त्यांची वाहतुकीचे नियमन करताना त्रेधा तिरपट उडत असल्याचे दिसले. तसेच कोरेगाव पार्क पोलिस व वाहतुक पोलिस हे नॉर्थ मेन रोडवरील मिरानगर व त्यापुढील चौकात जागोजागी वाहतुकीचे नियमन करताना दिसले. हडपसर, मगरपट्टा सिटी, मुंढव्याकडून कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, विमान तळ, येरवड्याकडे ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. त्यामुळे वाहनांची आधीच वर्दळ जास्त असते. या रस्त्यावर वारंवार रस्त्यावरील वाहतूक वारंवार ठप्प होत असते, परंतु त्यात आज तीनपट वाहनांची त्यात अधिक भर पडली. त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होवून त्रासाला सामोरे जावे लागले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply