माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना कोर्टाचा दणका; ११ तारखेपर्यंत सीबीआय कस्टडी

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका बसला आहे. त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने ११ तारखेपर्यंत सीबीआ कस्टडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अनिल देशमुख यांचा ताबा आता सीबीआयकडे देण्यात आले. तसेच, अनिल देशमुख यांना सीबीआय कोठडी मिळवण्यासाठी त्यांना कोर्टात हजर केले होते.

दोन दिवसांपुर्वी (4 एप्रिल) कारागृहामध्ये चालताना पडल्याने अनिल देशमुख यांच्या खांद्याला मार लागला होता. यामुळे अनिल देशमुख यांना उपचारासाठी शुक्रवारी दाखल करण्यात आले होते. त्यांनी अस्थिभंग विभागात दाखल करण्यात आले होते, तिथे त्यांचा एमआरआय  करण्यात आला होता. अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांचा ताबा आता सीबीआयला देण्यात होता. मात्र, देशमुख यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे सीबीआय अधिकाऱ्यांना आणखी काही काळ वाट बघावी लागली. ईडीच्या तपासानंतर आता भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पुढील चौकशीसाठी सीबीआयला अनिल देशमुख, सचिन वाझे , संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे या चौघांचा ताबा हवा आहे.

ईडीने 29 डिसेंबर 2021 रोजी माजी मंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवल्यानंतर काही दिवसांनी परमबीर सिंग यांनी 20 मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सचिन वाझे यांना मुंबईतील रेस्टॉरंट्स आणि बारमधून दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याची सूचना केल्याचा आरोप केला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply