“ महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कोणी खेळ केलाच तर मराठी माणूस उसळून बाहेर पडतो,” ईडी कोठडीतून संजय राऊतांनी मांडलं ‘रोखठोक’ मत

राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या विधानाचा सध्या ईडी कोठडीत असलेल्याशिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’मधून समाचार घेतला आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कोणी खेळ केलाच तर मराठी माणूस उसळून बाहेर पडतो, हा इतिहास आहे अशी आठवण संजय राऊतांनी करुन दिली आहे. मुंबईच्या विरोधातील कारस्थाने सुरूच राहतील, ती कायमचीच थांबवायला हवीत असं मतही संजय राऊत यांनी मांडलं आहे.

“राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची अखेर माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राबाबत चुकीची विधाने केल्याबद्दल पंडित नेहरू व मोरारजी देसाई यांनाही माफी मागावी लागली होती. नेहरू व मोरारजी देसाई यांनी इतिहासातील चुकीच्या संदर्भाचा आधार घेत विधाने केली. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाचा आगडोंब उसळला. नेहरूंसारख्या लोकप्रिय नेत्यालाही महाराष्ट्राची माफी मागावी लागली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कोणी खेळ केलाच तर मराठी माणूस उसळून बाहेर पडतो, हा इतिहास आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply