महाराष्टत येत्या तीन -चार दिवसात राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

राज्यात सध्या अवकाळी पाऊस सुरु आहे. राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असता अशात अवकाळी पावसाने आता शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. राज्यात पुढील तीन ते चार दिवस दक्षिण  कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. एस होसळीकर यांनी ट्वीट केले, “पुढील तीन ते चार दिवस दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.” आता असा अवकाळी पाऊस महाराष्ट्रासाठी नवीन नाही. मुंबई, मराठवाडा आणि विदर्भासाठी अवेळी पाऊस नित्याचाच झालाय, अशी म्हणण्याची वेळ आलीये. काही जण तर याला पावसाचं 'न्यू नॉर्मल' असंही म्हणत आहेत पण, हे असं असलं तरी अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. सध्या रब्बी हंगामातली गहू, हरभरा अशी पीकं शेतात उभी आहेत. त्यामुळे पाऊस आल्यास शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.  


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply