मनसे नेते यशवंत किल्लेदार यांना पोलिसांनी बजावली नोटीस

मुंबई: शिवसेना भवनाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी भोंग्यावर हनुमान चालीसा लावली होती. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली होती. या कारवाईनंतरही हनुमान जयंतीला शिवसेना भवनाबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितली होती. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आज, शनिवारी पोलिसांनी मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांना नोटीस बजावली आहे. 

मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हनुमान जयंतीला शिवसेना भवनाबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यानंतर आज, शनिवारी हनुमान जयंतीच्या दिवशी पोलिसांनी खबरदारी म्हणून यशवंत किल्लेदार यांना नोटीस बजावली आहे. राजकीय आणि प्रक्षोभक भाषणे, घोषणाबाजी, आक्षेपार्ह बॅनरबाजी झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटिशीत म्हटलं आहे.

यशवंत किल्लेदार यांना पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसे कार्यकर्त्यांना पोलीस नोटीस बजावतात; मग दादरमध्ये शिवसेनेकडून महाआरती करण्यात येत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना नोटीस का बजावली जात नाही, असा सवाल किल्लेदार यांनी उपस्थित केला आहे. तत्पूर्वी, हनुमान जयंती साजरी करत असताना राजकीय व प्रक्षोभक भाषणे, घोषणाबाजी, आक्षेपार्ह बॅनरबाजी झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याबाबत दादर पोलिसांकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, आज सकाळी 'सामना'च्या कार्यालयाबाहेर मनसेकडून खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply