‘मंदिरावर हनुमान चालिसा वाजवण्यासाठी आम्ही निशुल्क भोंगे देवू’

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढा नाहीतर आम्ही भोंग्यांविरोधात दुप्पट लाउडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाचू असा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला होता. यानंतर काल दुपारी घाटकोपर येथे मशिदी समोर भोंग्यावर (स्पिकरवर) हनुमान चालीसा वाजवली गेली. या घटनेमुळे घाटकोपर परिसरात मनसे आक्रमक झाले असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, चांदिवली विधानसभा मतदारसंघातील मनसे कार्यालयाबाहेर महेंद्र भानुशाली ) यांनी भोंगे लावले होते. पोलिसांनी सांगूनही भानुशाली यांनी भोंगे उतरवण्यास नकार दिल्याने पोलिसांनीच कार्यालयाबाहेरील भोंगे उतरवले आणि महेंद्र भानुशाली यांना ताब्यात घेतलं. या सगळ्या घटनानंतर आता या वादातमोहित कुंबोज यांनी उडी घेत एक वादग्रस्त ट्विट केलं आहे.

मंदिरावर हनुमान चालिसा वाजवण्यासाठी ज्यांना भोंगे हवेत त्यांनी आम्ही निशुल्क देवू. ज्यांना लावायचे आहेत त्यांनी बिनधास्त भोंगे लावावे. हिंदु एकतेचा आवाज घुमलाच पाहिजे, जय श्री राम ! हर हर महादेव! असे म्हणत त्यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यामुळे आता त्यांच्या या ट्विटवर सत्ताधाऱ्याकडून काय प्रतिक्रिया येत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *