मंगळुरूत ऑटोमध्ये स्फोट झाल्याने खळबळ, चालकासह प्रवासी जखमी; पोलिसांकडून तपास सुरू

कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये ऑटोमध्ये अचानक स्फोट झाल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत ऑटोचा चालक आणि प्रवासी जखमी झाले आहेत. या स्फोटाच्या कारणांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. या घटनेच्या व्हिडीओमध्ये सुसाट ऑटो रस्त्यावर थांबत असताना हा स्फोट झाल्याचे दिसून येत आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या शेजारी या ऑटोनं अचानक पेट घेतला.

“हा स्फोट का झाला याबाबत आत्ताच निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल. घटनेतील जखमी चालक आणि प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ते बोलण्याच्या स्थितीत नाही. या घटनेविषयी नागरिकांनी अफवा पसरवू नये. त्यांनी शांत राहावं आणि घाबरू नये”, असे आवाहन मंगळुरु पोलीस आयुक्त एन. शशीकुमार यांनी केले आहे.

एका प्रवाशाजवळ असलेल्या प्लॉस्टिकच्या पिशवीनं पेट घेतल्यानं हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या स्फोटाच्या कारणांचा नेमका खुलासा अद्याप झालेला नाही. या प्रकरणात मंगळुरू पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे. प्रवाशाकडे असलेल्या प्लॉस्टिक पिशवीतील साहित्याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरुन नमुने गोळा केले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply