भोसरी : भारतातील महाविद्यालयात प्रवेश द्या; युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची मागणी

भोसरी : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे वैद्यकीय शिक्षण घेणारे पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील विद्यार्थी भारतात परतले आहेत. युक्रेनमधील विद्यापीठांनी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू ठेवल्याने भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तरीही भारताने येथील वैद्यकीय महाविद्यालयात समावेश करून घेण्याच्या मागणीसह भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांची फी कमी केल्यास आम्हाला भारतातच शिक्षण घेणेही शक्य होईल असे विचार विद्यार्थ्यांनी मांडले आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेलेले विद्यार्थी भारतात परतले. मात्र युद्ध सुरू असल्याने शैक्षणिक नुकसान होण्याची भिती विद्यार्थ्यांना होती. मात्र युक्रेनमधील विद्यापिठांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांच्या शिक्षकांना शेजारील देशात पाठवून त्या ठिकाणाहून ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे सुरू असलेले हे युद्ध लवकरात लवकर थांबवले जाणे गरजेचे असल्याचे मतही काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.  


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply