भारत – युकेच्या पंतप्रधानांची ‘मन की बात’, दिवाळीपर्यंत करार पूर्णत्वास जाण्याची अपेक्षा

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन सध्या भारत दौऱ्यावर असून, आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भट घेत चर्चा केली. यावेळी जॉन्सन यांनी भारताने केलेल्या त्यांच्या भव्य स्वागताबद्दल आभार मानले. भेटीदरम्यान, जॉन्सन आणि मोदी यांच्यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली असून, भारत आणि ब्रिटन देशांमध्ये मुक्त व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याचे मान्य केले असून, हा करार येत्या दिवाळीपर्यंत अस्तित्त्वात येण्याचा अंदाज जॉन्सन यांनी वर्तवला आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारत आणि ब्रिटन यांच्यात मुक्त व्यापार कराराची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.

जॉन्सन म्हणाले की, भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करारामुळे 2035 पर्यंत ब्रिटनचा एकूण व्यापार 28 अब्ज पौंड होईल आणि युक्रेनमधील उत्पन्न 3 अब्ज पौंडांनी वाढेल. नोकरशाही कमी करण्यासाठी आणि संरक्षण खरेदीमध्ये वितरणाचा कालावधी कमी करण्यासाठी यूके भारतावर लक्ष केंद्रित करून एक सामान्य निर्यात परवाना तयार करत आहे. तर, दुसरीकडे इंडो-पॅसिफिकमध्ये नवीन लढाऊ जेट तंत्रज्ञान, हेलिकॉप्टर आणि पाण्याखालील युद्धक्षेत्रात सहकार्यासह सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी ब्रिटन भारतासोबत सहयोग करेल असे ब्रिटीश उच्चायुक्तालयाच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, भारत स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना, ब्रिटिश पंतप्रधानांची भारत भेट ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. बैठकीदरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये मुक्त व्यापार करार, ग्लासगो क्लाइमेट कमिटमेंट आणि "मुक्त आणि खुले" हिंद-प्रशांत महासागर आदी विषयांवर सखोल चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply