Sharpshooter Sambhaji Patil died in an accident.
भरधाव फॉर्च्युनर कार अवजड वाहनाला मागून धडकल्याने आंतरराष्ट्रीय नेमबाजाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मुंबई -अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या हद्दीत घडली आहे. या भीषण अपघातात आलिशान फॉर्च्युनर कारचा पुढचा भाग अक्षरश: चेंदामेंदा झाला असून या अपघातात आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी शिवाजी झणझण पाटील (वय 27) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा सहकारी यश प्रशांत चौधरी (वय 22 ) गंभीर जखमी झाले आहेत. पुण्याहून गुजरातला येताना मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर जवळ दुर्वेश गावाच्या हद्दीत हा भयंकर अपघात झाला.
आंतरराष्ट्रीय किर्तीचे नेमबाज संभाजी पाटील आणि त्यांचा मित्र प्रणय प्रशांत चौधरी हे पुण्याहून गुजरातला जात होते.सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पालघरच्या दुर्वेश गावाच्या हद्दीत प्रणय याने भरधाव कार दुसऱ्या मार्गिकेतून पहिल्या मार्गिकेत नेताना समोरच्या हायवा ट्रकचा अंदाज न आल्याने दोन वाहनांची भीषण टक्कर झाली. या अपघातात पाटील यांची जागीच मृत्यू झाला तर प्रणय जखमी झाला आहे.
अपघातानंतर महामार्ग पोलिस आणि मनोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाटील यांना रुग्णालयात तपासून मृत घोषीत करण्यात आले तर प्रणय यांच्यावर उपचार सुरु आहेत. संभाजी पाटील हे बालेवाडी क्रीडा संकुलात क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होते. पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर छत्रपती संभाजीनगर येथील मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत अशी माहिती मनोर पोलिसांनी दिली आहे.
कारचे बोनेट संपूर्णपणे नष्ट
मुंबई अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या हद्दीत झालेल्या या भीषण अपघातात आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटील यांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने क्रीडा विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. पुण्याहून गुजरातकडे येत असताना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर जवळ दुर्वेश गावाच्या हद्दीत भरधाव फॉर्च्युनर कार अवजड वाहनाला मागून धडकली. या कारचे बोनेट संपूर्णपणे नष्ट झाले असून केवळ मागचा भाग आणि चाकेच उरली आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


