भयंकर! नाशिक जिल्ह्यात बंधारा फुटला; अलंगुन गावात शिरलं पाणी, शेतीची राखरांगोळी

नाशिक : राज्यात पावसाचा जोर वाढला असतानाच नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्याला अक्षरश: झोपडून काढलं आहे. त्यातच जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील मातीचा बंधारा फुटल्याने अलंगुन गावात पाण्याचे लोट शिरले आहे. अचानक मोठ्या प्रमाणात गावात पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली आहे. गावातील 10 ते 15 घरात बंधाऱ्याचे पाणी शिरल्याने आदिवासींच्या घराचे मोठे नुकसान झाले आहेत.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने रस्ते जलमय झाले असून नदी नाल्यांना पूर आलाय. त्यातच जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात बंधारा फुटल्याने शेजारील असलेल्या अलंगुन गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे. अचानक गावात पुराचे पाणी आल्याने आदिवासींच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी संसारउपयोगी वस्तु तसेच भातशेती वाहून गेल्याने गावकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट

गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून नाशिक शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, प्रशासनाने खबरदारी घेत नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये अनेक भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा देखील देण्यात आला आहे. याशिवाय धोक्याच्या ठिकाणी असलेल्यांनी तातडीने प्रशासनाशीसंपर्क करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असंही सांगण्यात आलं आहे. जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर झाल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply