भगूर ग्रामीण रुग्णालयाला मान्यता; नागरिकांची मागणी होणार पूर्ण

नाशिक : भगूरला नव्याने ग्रामीण रुग्णालय उभारण्याच्या मंजूरीबाबत आरोग्य विभागाने गुरुवारी (ता. १७) आदेश काढले आहेत. यामुळे नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे. भगूरला नगरपरिषद आहे. मात्र, त्यात अनेक सोयी-सुविधांची वानवा आहे. पंचक्रोशीसह नाशिक तालुक्यातील अनेक गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण असल्याने कोरोना काळातही या भागातील रुग्णांना देवळाली कॅन्टोन्मेंट, नाशिक महापालिका आणि जिल्हा रुग्णालयाशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अशा पार्श्‍वभूमीवर भगूरला ग्रामीण रुग्णालय व्हावे, असा प्रस्ताव देण्यात आला होता. आरोग्य विभागाने त्याला मान्यता दिली असून, त्यासाठी जागा उपलब्ध करुन देणे, बांधकाम आराखडा तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याचा आदेश काढला आहे.  


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply