ब्रुसेल्स : रासायनिक हल्ल्यांना चोख उत्तर देऊ; ज्यो बायडेन

ब्रुसेल्स : ‘‘युक्रेनविरोधातील युद्धात पुतीन यांनी रासानिक शस्त्रांचा वापर केल्यास ‘नाटो’ याला जशास तसे उत्तर देईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला. युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला औद्योगिक आण विकसनशील देशांच्या ‘जी २०’ गटातून बाहेर काढायला पाहिजे, असे आवाहन करीत तसे केल्यास रशिया जगातील शक्तीशाली अर्थव्यवस्थांपासून तुटेल, असे ते म्हणाले. उत्तर अटलांटिक करार संघटनेच्या (नाटो) परिषदेत बायडेन यांचे गुरुवारी भाषण झाले. रशियाचे युक्रेनमधील हल्ले आणि जर पुतीन यांनी रासायनिक, जैविक आणि अण्वस्त्रांचा वापर केला तर त्याला उत्तर कसे द्यायचे हे ठरविण्यासाठी ‘नाटो’सदस्यांची काल चर्चा झाली.

बायडेन म्हणाले, की रशियाकडून रासयनिक हल्ले झाल्यास त्यांनाही त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल. याबाबचा निर्णय वेळ पाहून घेतला जाईल. रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यासाठी पाऊल उचलले आहे. या कारवाईबद्दल रशियाला ‘जी२०’ गटातून बाहेर काढायला हवे. रशियाला संघटनेतून वगळण्यास सदस्य देशांची मंजुरी न मिळाल्यास ‘नाटो’च्या बैठकीत सहभाग घेण्याची परवानगी युक्रेनला दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘नाटो’चे सदस्यांमध्ये आज दिसणारी एकजूट यापूर्वी कधीही दिसली नव्हती. युक्रेनवरील हल्ल्यानंतर पुतीन यांना उलट परिणाम मिळत आहेत, असे सांगत एक लाख युक्रेनी निर्वासितांचे स्वागत करण्याची तयारी अमेरिकेने यावेळी दाखविली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply