बेळगाव : मरणानंतर सहा जणांना जीवदान; अवयवदानातून कमावलं पुण्य

बेळगाव : अवयदानामुळे अलीकडच्या काळात अनेकांना जीवदान मिळाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. यामुळे दिवसेंदिवस अवयव दान करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. अशातच अवयवदानाचं  महत्व सांगणारी आणखी एक सकारात्मक घटना समोर आली आहे. बेळगावच्या उमेश बी दांडगी (५१) यांनी तब्बल सहा रुग्णांना नवं जीवन दिलं आहे. उमेश यांचा 8 मार्च रोजी अपघात झाला होता, या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. बेळगावच्या केएलईएस हॉस्पिटलमध्ये क्रॅनियोटॉमी करण्यात आली. त्यानंतर 16 मार्च रोजी त्यांना दुर्दैवानं ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. मात्र त्यांनी आपले अवयवदान करण्याचा निर्णय घेतलेला होता. अवयव दान करण्याच्या नियमांनुसार, कर्नाटकातील जीवासार्थकाथे या संस्थेच्या अधिकार्‍यांनी अवयवदानाची प्रक्रिया सुरू केली आणि कुटुंबातील सदस्यांची लेखी संमती घेतली. प्रतीक्षा यादीनुसार काही रुग्णांची निवड करून अवयवांची वाटणी करण्यात आली. उमेश दांडगी यांचं हृदय बेळगाव येथील के.एल.ई.एस रुग्णालयातील रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आलं. तर त्यांची किडनी ग्रीन कॉरिडॉरद्वारे धारवाड येथील एस.डी.एम रुग्णालयातील रुग्णासाठी हुबळी येथे पाठवण्यात आली. त्यांचे कॉर्निया KLE नेत्र रुग्णालय आणि त्वचा देखील संबंधीत स्कीन बँकांना दान करण्यात आली. 16 मार्च रोजी बेळगाव विमानतळावरून काही तासांतच त्यांचं यकृत बेंगळुरूला एअरलिफ्ट करण्यात आलं. वाहतुकीत वेळ वाया जाऊ नये यासाठी बेंगळुरू वाहतूक पोलिसांनी BIAL विमानतळ ते स्पर्श हॉस्पिटलपर्यंत असा 'ग्रीन कॉरिडॉर' तयार करण्यात आला होता.  


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply