बुलडाणा, अमरावतीला अवकाळी पावसाचा फटका; बळीराजा पुन्हा संकटात

राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मध्यरात्रीनंतर बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण होतंच. आता ह्या अवकाळी पावसामुळे तूर, हरभरा, कांदा अशी पिकं धोक्यात आली आहेत.बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव, नांदुरा, शेगाव इथं पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. तर भंडारा, गोंदियात झालेल्या मुसळधार पावसामुळे पालेभाज्यांना फटका बसला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply