बीड : धक्कादायक! बीडमध्ये नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात जिवंत जाळण्याचा प्रयत्न

बीडच्या केज तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाल्याची थरारक घटना आज घडली आहे. या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या असून सध्या त्यांच्यावर बीडच्या केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.

नायब तहसीलदारआशा वाघ आज जेवण करून तहसील कार्यालयाकडे येत होत्या. या दरम्यान एका चारचाकी वाहनाने त्यांचा रस्ता अडवला. त्यातून उतरलेल्या एका महिलेसह इतर 4 जणांनी त्यांच्यावर हल्ला केलाय. यावेळी हल्लेखोरांनी बॉटलमधील पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यातून त्या बालंबाल बचावल्या आहेत.

दरम्यान, केज येथील तहसील कार्यालयात घुसून नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर, यापूर्वीच कौटुंबिक कलहातून त्यांच्या सख्ख्या भावानेच कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना 6 जून 2022 रोजी घडली होती. नायब तहसीलदार आशा वाघ यांच्या मानेवर व डोक्यात वार करण्यात आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.

आशा वाघ आणि त्यांच्या भावामध्ये शेतीच्या कारणावरून वाद सुरू आहे. आशा वाघ यांच्यावर हल्ला कोणी केला हे अद्याप समोर आलेलं नाही. पण मधुकर वाघ यांनी हा हल्ला केल्याची चर्चा सुरु आहे. पण आधीच्या हल्ल्याप्रकरणी मधुकर वाघ सध्या तुरुंगात आहेत. आरोपी हल्ल्यानंतर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना घडलीय. काल बीडच्या सांडरवन गावात खुनाची घडली होती. आज पुन्हा बीड शहरातील भररस्त्यात, 40 वर्षीय हॉटेल कामगारांचा खून करण्यात आल्याची घटना घडलीय. शहरातील धानोरा रोड परिसरात असणाऱ्या पालवन चौक परिसरात, हा ही खूनाची घटना घडलीय. दत्ता राधाकिशन इंगळे वय 40, रा. हिवरसिंगा ता. शिरुर कासार असे मयताचे नाव आहे. मयत बीड शहरातील एका हॉटेल मध्ये काम करत होता. दरम्यान शिवाजी पोलीस ठाण्याचे पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply