बारामती : संत श्री तुकाराम महाराजांची पालखी : काटेवाडीत पार पडले मेंढ्यांचे गोल रिंगण

बारामती : ज्ञानदेव माउली तुकाराम’चा जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर अशा वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मेंढ्यांचे पहिले गोल रिंगण बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे उत्साहात पार पडले आहे. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ म्हणत मजल दरमजल करत बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात दाखल झाला. त्यानंतर परंपरेनुसार परीट समाजाने पालखीचे धोतराच्या पायघड्या घालून स्वागत केले. गेल्या १३७ वर्षांपासून ही प्रथा सुरू असून, संत गाडगेबाबांच्या शिकवणुकीतून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले मेंढ्याचे रिंगण पार पडले . 

जनाई मुक्ताई, सोबत माऊली,नामा तुकोबाची जोड, डोई तुळस ठेवली,भाळी चंदनाचा टिळा, माळ गळ्यात घातली केला विठूचा कल्लोळ, दिंडी पंढरी चालली !! असे अभंग म्हणत तुकोबारायांची पालखी काटेवाडी येथे मेंढ्याच्या पहिल्या गोल रिंगण सोहळ्यासाठी पोहोचली. रिंगणाच्या वेळी टाळ-मृदंगाचा गजर, तुकोबा-माउलींचा नामघोष भाविकांचा उत्स्फूर्त जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात काटेवाडीतील मेंढ्यांचे पहिले गोल रिंगण पार पडले.

काटेवाडी परिसरातील भाविकांनी काटेवाडी बस स्थानकाजवळ पालखीचे स्वागत केल्यानंतर गावातील मैदानावर पालखी नेण्यात आली. या वेळी पालखीभोवती वारकऱ्यांनी रिंगण केले. त्यानंतर सुरू झाला डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा पार पडला. यानंतर पालखीने बारामती तालुक्याचा निरोप घेऊन इंदापूर तालुक्यामध्ये प्रवेश केला.

दरम्यान, आज संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात दाखल झाला. त्यानंतर परिट समाजाकडून धोतराच्या पायघड्या घालून स्वागत करण्याची पद्धत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा चालत आली आहे. संत गाडगे महाराजांच्या शिकवणुकीतून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply