बारामती : अजित पवाराच्या विरोधात बारामतीमध्ये निषेधाच्या घोषणा

बारामती : धर्मवीर संभाजी महाराजांबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या उल्लेखाच्या निषेधार्थ आज बारामतीत भाजपच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला.बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात मोठी रॅली काढून निषेध नोंदविण्यात आला. भिगवण चौकात पवार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या.

यावेळेस पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा प्रदेशचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, यांनी भाषण करुन निषेध नोंदवला. चिटणीस अविनाश मोटे, जालिंदर कामठे, बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, रंजन तावरे, तानाजी थोरात, सुरेंद्र जेवरे, मारुती वणवे, देवेंद्र बनकर, माऊली चवरे, युवराज मस्के, ॲड शरद जामदार, जीवन कोंडे उपस्थित होते.

बारामती शहराध्यक्ष सतीश फाळके, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड गोविंद देवकाते ,राजेश कांबळे, शहाजी कदम , ॲड.जी के देशपांडे, प्रमोद खराडे, भारत देवकाते, ॲड ज्ञानेश्वर माने, सुनील माने, युवराज तावरे, प्रमोद तावरे,अभिजीत देवकाते, प्रमोद डिंबळे, पोपटराव खैरे,अक्षय गायकवाड उपस्थित होते.

सहयोगसमोरही घोषणाबाजी व निषेध

दरम्यान दुपारी बाराच्या सुमारास शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करत त्यांचा निषेध केला. त्यांच्या विरोधात घोषणा देत त्यांनी अजित पवार यांनी माफी मागण्याची मागणी केली. पोलिसांनी हस्तक्षेप करुन जवळपास 32 जणांना या प्रकरणी ताब्यात घेतले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply