बारामतीच्या डॉ. सतीश पवार यांनी जगाला नव्या तंत्रज्ञानाची करुन दिली ओळख…

बारामती : येथील डॉ. सतीश पवार यांनी अमेरिकेत नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत एका महत्वाच्या विषयावर शोधनिबंध सादर केला. या शोधनिबंधाच्या निमित्ताने त्यांनी एका नवीन तंत्रज्ञानाची ओळख जगाला करुन दिली आहे. जागतिक पातळीवर महत्तवपूर्ण समजल्या जाणाऱ्या अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ अल्ट्रासाऊंड इन मेडिसिन (AIUM) या आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध प्रकाशित करण्याचे अनेक रेडीओलॉजिस्ट डॉक्टरांचे स्वप्न असते.

बारामतीत गेली 25 वर्षे अत्याधुनिक व अद्यावत सोनोग्राफी मशीनस् आणून रूग्णांना सेवा देणारे डॉ. सतीश पवार यांनी नुकत्याच अमेरिकेतील सॅन डियागो येथे झालेल्या AIUM या कॉन्फरन्समध्ये अत्यंत क्लिष्ट व सर्वोत्तम सोनोग्राफी मशीन्सवरही निदान करण्यास अवघड असलेला गुढघ्यातील Ultrasonography of anterior cruciate ligament या विषयावरील शोधनिबंध सादर केला. जगभरच्या सोनोग्राफी तज्ज्ञांसाठी MRI च्या तुलनेत अल्पदरात व सहज होऊ शकणाऱ्या सोनोग्राफीतील एका नवीन तंत्राची ओळख जगाला करून दिली.

वृद्धापकाळामुळे, एखाद्या दुखापतीमुळे गुडघ्यातील कुरचा, लिगामेंटस् खराब होतात. गुडघ्याच्या आतील सोनोग्राफी या संशोधनामुळे आता शक्य झाली आहे. गुडघ्याची इजा तात्पुरती अथवा दीर्घकालीन आहे, सौम्य व गंभीर आहे, याचे निदान या सोनोग्राफीमुळे होत आहे. गुडघ्यातील लिगामेन्टसमधील आठ प्रकारच्या इजा डॉ. सतीश पवार यांनी या जागतिक परिषदेत सादर केल्या. अमेरिकेतील या परिषदेत संशोधन सादर करणारे भारतातील ते एकमेव सोनॉलॉजिस्ट होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “बारामतीच्या डॉ. सतीश पवार यांनी जगाला नव्या तंत्रज्ञानाची करुन दिली ओळख…

Leave a Reply