
मुंबई : सहकारी संस्थांमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारने घेतला होता. मात्र, सहकार क्षेत्रातील स्वपक्षीय नेत्यांच्या प्रखर विरोधामुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत गावातील विकास सोसायटीचे संचालक आणि ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो. मात्र सहकारी संस्थांमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्राबल्य मोडीत काढण्यासाठी भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात ऑगस्ट २०१७ मध्ये बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार सर्व खातेदार शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी घेतला होता. कालांतराने या निर्णयानुसार डझनभर बाजार समित्यांच्या निवडणुकाही झाल्या. मात्र ही निवडणूक पद्धती वेळकाढू आणि खर्चीक असल्याचे समोर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द केला.
राज्यात सत्ताबदल होताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा बाजार समिती निवडणुकीत खातेदार शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देण्याची भूमिका घेतली. त्यानुसार बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये थेट मतदान करता येईल असा निर्णय १४ जुलैच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ज्यांच्याकडे ‘दहा आर’ इतकी जमीन असेल अशा १८ वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि पाच वर्षांमध्ये किमान तीन वेळा संबंधित बाजार समितीत कृषी मालाची विक्री केली असेल, अशा शेतकऱ्याला थेट मतदानाचा अधिकार देताना ग्रामपंचायत आणि सेवासंस्थांच्या सदस्यांचा मताधिकार रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या निर्णयानुसार पणन कायद्यात सुधारणा करण्याचा अध्यादेश काढण्याचा आणि पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्याची घोषणा सरकारने केली होती. या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत होत असतानाच दुसरीकडे मात्र सरकारमधून तीव्र विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे दोन महिन्यांनंतरही हा निर्णय नस्तीमध्येच अडकून पडला आहे. याबाबत पणन विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नव्या सरकारने सवंग लोकप्रियतेच्या नादात कोणतीही शहानिशा न करता घाईगडबडीत हा निर्णय घेतला. मात्र त्याला भाजप आणि शिंदे गटातील अनेक नेत्यांनी विरोध केला आहे.
मुळातच राज्यातील ३०७ बाजार समित्यांपैकी नवी मुंबई, नाशिक. पुणे, कोल्हापूर, लासलगाव, नागपूर अशा काही बाजार समित्या आर्थिकदृष्टय़ा सक्षम असल्या तरी उर्वरित ५० टक्क्यांहून अधिक बाजार समित्या कमकुवत आहेत. तर बाजार समित्यांच्या क्षेत्रात हजारो शेतकरी आहेत. त्यामुळे या निवडणुकींचा खर्च बाजार समित्या आणि उमेदवारांनाही परवडणारा नाही. शिवाय प्रचलित पद्धतीने सेवा संस्था आणि ग्रामपंचायत सदस्यांशी संपर्क करणे आणि निवडणुकीत बाजी मारणे तुलनेने सोपे आहे. जर सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला तर आपला टिकाव लागणार नाही, अशी भीती भाजप आणि शिंदे गटातील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यामुळे निर्णय मागे..
निवडणुकीचा खर्च बाजार समित्यांना परवडणारा नसल्याने तो सरकारने करावा, अशी भूमिका भाजपमधील काही नेत्यांनी घेतली आहे. मात्र बाजार समित्यांकडून सरकारला काहीही उत्पन्न मिळत नसताना सरकारने हा खर्च का करावा अशी भूमिका विभागाने घेतल्याचे समजते. त्यामुळे दोन्ही पक्षांतून होणाऱ्या विरोधामुळे अखेर या निर्णयाची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून हा निर्णय नस्तीतच रखडल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे २८३ बाजार समित्यांच्या जाहीर झालेल्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
महाराष्ट्र
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

