शरीर निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. फक्त भाज्या, धान्ये किंवा फळे खाल्यामुळे आरोग्य निरोगी राहते असे नाही. तुमच्या आहारात नेहमीच्या अन्नापेक्षा इतरही अन्न सामील करणे गरजेचे आहे. यामुळे अनेक लोक आहारात ड्रायफ्रुटचा समावेश करतात. यामुळे शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य सुधारण्यासही मदत होते. काजू, बदाम, मनुके, पिस्ता, अंजीर अशा प्रत्येक ड्रायफ्रुटचे फायदे आणि ते खाण्याची पद्धत वेगवेगळी आहे. यातील काही ड्रायफ्रुट भिजवून खाल्ले जातात. कोणते ड्रायफ्रुट किती वेळ भिजवणे फायदेशीर असते ते जाणून घेऊयात.
बदाम कसे खावेत?
आहारात बदामाचा समावेश केल्याने मेंदूचे आरोग्य सुधारते, त्वचेला चमकदार बनते आणि अस्वस्थ इच्छा नियंत्रित होण्यास मदत होते. बदाम खाण्यापूर्वी 8 ते 12 तास पाण्यात भिजवून ठेवावेत. त्यानंतर सकाळी ते सोलून रिकाम्या पोटी खावेत. वयानुसार किती बदाम खावेत हे देखील ठरलेले आहे. जर तुम्ही तरुण असाल तर तुम्ही 5 ते 7 बदाम खाऊ शकता. मात्र तुमची पचनक्रिया व्यवस्थित नसेल तर तुम्ही त्यापेक्षा कमी बदाम खाऊ शकता.
अक्रोड कसे खावेत?
अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतात, जे तुमच्या मेंदू आणि हृदयासाठी फायदेशीर असतात. यामुळे झोप सुधारण्यास मदत होते. अक्रोड खाण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्ता ही आहे. अक्रोड 4 ते 6 तास भिजवून ठेवा आणि दररोज 1 ते 2 अक्रोड खाणे पुरेसे आहे.
काजू कसे खावेत?
काजू खाल्ल्याने तुमची ऊर्जा वाढते आणि मूड चांगला राहतो. काजूला भिजवण्याची गरज नाही. मात्र तुम्हाला ते कोरडे खायचे नसतील तर ते 1 ते 2 तास भिजवू शकतो. तुम्ही दररोज 2 काजू खाणे खूप फायदेशीर ठरेल.
पिस्ता भिजवून खावा का?
पिस्ता असे ड्रायफ्रुट आहे जे भिजवण्याची आवश्यकता नाही. पिस्ता तुम्ही तसेच खाऊ शकता. यात जास्त प्रमाणात प्रोटीन असतात. यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते आणि साखरेची पातळी नियंत्रित होते. तुम्ही पिस्ता दुपारचा नाश्त्या म्हणून खाऊ शकता. दररोज 4 ते 5 पिस्ते खाऊ शकता.
मनुके कसे खावे?
मनुके हे लोहाचे स्रोत आहेत. ते तुमचे हिमोग्लोबिन वाढवण्यास, त्वचेचे आरोग्य राखण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात. मनुके 3 ते 4 तास भिजवून सकाळी खा. दररोज 6 ते 8 मनुके पुरेसे आहेत.
खजूर
खजूर हे एक उत्कृष्ट ऊर्जा वाढवणारे ड्रायफ्रुट आहे. तुम्ही दररोज 1 ते 2 खजूर खाऊ शकता. व्यायामापूर्वी खजूर खाल्याने त्वरित ऊर्जा मिळते. हे आतड्यांसाठी फायदेशीर आहे. तसेच खजूर रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. खजूर खाण्यापूर्वी भिजवण्याची गरज नाही.
अंजीर कसे खावे
ड्राय अंजीर खाण्यापूर्वी ते भिजवणे गरजेचे आहे. अंजीर फक्त 3 ते 4 तास भिजवणे गरजेचे आहे. दररोज 1 ते 2 तुकडे खाणे पुरेसे आहे. यामुळे प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांसाठी देखील फायदेशीर मानले जातात. तुम्ही अंजीर दररोज सकाळी खाऊ शकता.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


