पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीचा वाद; अजित पवारांनी केंद्राला ठणकावलं,

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल महाराष्ट्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करावा असं वक्तव्य केलं होतं. पंतप्रधानांच्या या वक्तव्याला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.जीएसटी परतावा केंद्राकडून येणे बाकी असून पेट्रोल डिझेल कर कमी करण्यासदर्भात पंतप्रधान म्हणाले, मात्र आम्ही कोणताही कर वाढवला नाही. कराबाबत एकमताने निर्णय घेण्यात येतात. आज मुख्यमंत्री आम्हाला सांगतील कालच्या VC मध्ये काय झालं. आज आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करू आणि मग का एक्शन घ्यायची हे ठरवू असं अजित पवार यांनी आज पकारांशी बोलताना सांगितलं.

तसंच GST चा परतावा लकवरच येईल हे अपेक्षित असून देशात बाहेरून इंधन येते त्यावर पहिलं केंद्रसरकार कर लावते. मग राज्य लावत असते. केंद्रानेही आपला कर कमी करावा त्यांना खूप अधिकार आहे प्रत्येक वेळी राज्यावर ढकलू नये. तसंच राज्यातून खूप टॅक्स केंद्राला मिळतो त्यामानाने आपल्याला निधी मिळत नाही. केंद्र सरकारने जर राज्यांनी इतकाच टॅक्स लावावा, असा निर्णय घेतला तर तो लावता येईल. पण राज्याची स्थिती आणि कर वसुली पाहता परतावा ही तेवढा व्हायला हवा असही पवार म्हणाले.

दरम्यान, भाजपनेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी युतीबाबत केलेल्या वक्तव्यावर पवार म्हणाले, २०१७ सालीच आशिष शेलार यांनी सांगायचे होते, पाच वर्ष का थांबला? आपण २०२२ मध्ये आहोत आता त्यावेळचं का सांगत आहात, तसंच आता यामध्ये कोणाला रस नाही असंही ते म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply