पुण्यात सदनिकांच्या सर्वांत महाग दरात कोरेगाव पार्क आघाडीवर

पुणे - शहरातील कोरेगाव पार्क हा परिसर निवासी सदनिका (Flats) घेण्याच्या दृष्टीने सर्वांत महागडा ठरला आहे. मात्र, या परिसरातील मोकळ्या जागेचा (Empty Space) दर मात्र कमी आहे. या उलट उच्चभ्रू वस्तीच्या प्रभात रस्त्यावरील मोकळ्या जमिनींचा दर सर्वाधिक, तर सदनिकांचा दर हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. कोरेगाव पार्कमधील सदनिकांचा रेडी-रेकनरमधील (Ready Reckoner) दर प्रति चौरस मीटरसाठी १ लाख ७२ हजार ५८० रुपये आणि मोकळ्या जमिनींचा दर ६१ हजार ४० रुपये प्रति चौरस मीटर इतका आहे. तर प्रभात रस्त्यावरील सदनिकांचा दर १ लाख ५४ हजार रुपये प्रति चौरस मीटर असून, मोकळ्या जमिनींचा दर हा ८० हजार २८० प्रति चौरस मीटर एवढा आहे.

उंड्री येथील मोकळ्या जमिनींचा दर सर्वात कमी असून तो ४ हजार ५०० रुपये प्रति चौरस मीटर इतका आहे. तर धानोरी येथील सदनिकांचा दर सर्वांत कमी म्हणजे २७०० रुपये प्रति चौरस मीटर इतका आहे. महापालिका क्षेत्रासाठी रेडी-रेकनरचे नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. पुणे शहरात सरासरी ८.१५ टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ करताना या परिसरांत मागील दोन वर्षांत झालेले खरेदी-विक्री व्यवहार, परिसराची संभाव्य वाढ, विकसन क्षमता याचा आधार घेण्यात आला आहे. त्यानुसार कोरेगाव पार्क परिसर हा सर्वांत महागडा ठरला आहे. कोथरूड परिसरात मोकळ्या जागांचा दर हा ४५ हजार रुपये प्रति चौरस मीटर, बाणेरमध्ये ३५ हजार ९०० रुपये प्रति चौरस मीटर तर बालेवाडी परिसरात ३१ हजार ४३० रुपये प्रति चौरस मीटर इतका दर आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply