पुण्यात मनसे गारद… तीन दिवसात तिसरा राजीनामा!

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अजून एक धक्का बसला आहे. मनसेच्या पुणे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी राजीनामा दिला असून शहरात मनसे गारद झाल्याचं चित्र आहे. शहराध्यक्ष वसंत मोरे यांची पदावरून हकालपट्टी झाली. त्यानंतर पक्षांतर्गत वातावरण आणखी तापलं आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसाचे स्पीकर लावा असे आदेश दिलेले असताना त्यास विरोध करणे मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना भोवलं. या पदावर हकालपट्टी करून माजी नगरसेवक व गटनेते साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आता पक्षातील खदखद वाढत असल्याचं स्पष्ट झालंय. अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे दिला राजीनामा सोपवला आहे.

पक्ष स्थापन झाल्यापासून आत्ताच जर पाडव्याच्या वेळी मशिदींवरील भोंग्यांचा त्रास होत असेल तर नक्कीच काहीतरी चुकीचं होत आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. याआधी देखील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. राज ठाकरेंनी केलेल्या त्या विधानानंतर अनेक कार्यकर्ते नाराज असल्याचं दिसतंय.

पुण्यातील माजीद अमीन शेख हे वॉर्ड क्रमांक 84 शाखा अध्यक्ष होते. त्यांनी सर्वप्रथम राजीनामा दिला. तसेच मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलंय की, आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या? आज समाजात सामोरे जाताना जाणीव झाली. 16 वर्षांचा फ्लॅश बॅक आठवला आणि डोळ्यात पाणी आलं, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच मुस्लिम पदाधिकारी बैठक घेऊन पुढील निर्णय घेतील असंही त्यांनी म्हटलंय. यानंतर मनसे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष पंजाबी यांनीही राजीनामा देत पदभार सोडला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply