पुण्यात भयंकर घटना! बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा केला प्रयत्न

पुण्यामधील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत असतानाच पुन्हा एकदा पुण्याला हादरवणारी घटना घडली आहे. बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी पीडित महिलेला पुण्यात आरोपीने पेट्रोल टाकून जाळण्याचा केला प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बातमीने खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मुंढवा भिमनगर मधील म्हाडा कॉलनीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रमजान खलील पटेल असे आरोपीचे नाव असून आरोपी रमजान याच्यावर पीडित महिलेने २०२८ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील पांगरी पोलीस स्थानकात बलात्काराची तक्रार दाखल केली होती.

ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपीने महिलेकडे तगादा लावला होता. घटनेतील आरोपीने काल दुपारच्या सुमारास महिलेला तू दाखल केलेली बलात्काराची तक्रार पाठीमागे घे म्हणत तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा केला प्रयत्न केला.

याप्रकरणी आरोपीवर पुण्यातील मुंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या घटनेतील आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशीही करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर पुण्यातील वाढती गुन्हेगारीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *