पुण्यात बॉम्बसदृश वस्तू आढळली; बॉम्बशोध पथक दाखल

पुणे: पुणे शहराजवळील मांजरी खुर्द स्मशानभुमीजवळ बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे. स्मशानभुमीजवळ एका नागरीकाला पहिल्यांदा ही वस्तू दिसली. घटनास्थळी पुणे शहर पोलीस दलाचे बॉम्ब स्कॉड पथक दाखल झाले आहे.

पुण्यातील हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथली आण्णासाहेब मगर विद्यालयात ही वस्तू सापडली आहे. अभिमान रोहिदास गायकवाड यांच्या ही वस्तू निदर्शनास आली. त्यांनी पोलीस पाटील अंकुश उंद्रे व अशोक आव्हाळे यांना याविषयी माहिती दिली. या दोघांनी लोणीकंद पोलीस (Police) स्टेशनच्या पी आय गजानन पवार यांना संपर्क करुन माहिती दिली.

यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. तात्काळ बॉम्बशोध पथक दाखल झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 'याठिकाणी खूप वर्षांपूर्वीचा जुना ग्रेनेड तिथे आढळून आला आहे. ७,८ वर्षापूर्वी त्या ठिकाणी भराव टाकण्यात आला होता. पावसामुळे ते आता वर आलेले दिसत आहे. पोलीस आणि बॉम्ब शोध पथक तपास करत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *