पुण्यात पुन्हा हेल्मेटसक्ती; ४ वर्षांवरील सर्वांना असणार बंधनकारक

पुणे: पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती होणार आहे. शासकीय कर्मचारी, शाळा, कॉलेज, महानगरपालिका, महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या सर्वांना हेल्मेट बंधनकारक असणार आहे. ४ वर्षांवरील सर्वांना हेल्मेट सक्तीचे असणार आहे. हे आदेश १ तारखेपासून लागू होणार आहेत. अपघातात सर्वांत जास्त अपघात दुचीकी चालवणाऱ्या यांचे होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबतच्या आदेशामध्ये म्हटलंय की, वाहन अपघातामध्ये दगावणाऱ्या व्यक्तींमध्ये सुमारे ८० टक्के व्यक्ती या वाहन चालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात. कार चालकांच्या तुलनेने दुचाकी वाहन चालकाला अपघातात मृत्यू येण्याचा धोका सातपट जास्त आहे. जितके चाकी गार चालक ने अपमानात दगावतात, त्यापैकी सुमारे ६२ टक्के व्यक्तीना डोक्याला हेल्मेट नसल्यामुळे मृत्यू होतात. त्यामुळे हेल्मेट असल्यास अपघात झाल्यास जीव वाचण्याची शक्यता 80 टक्क्यांनी वाढते.

त्यामुळेच, जनतेस मार्गदर्शक ठरावे या दृष्टीने तसेच सह प्रवाशाच्या सुरक्षिता सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना किंवा ये जा करताना हेल्मेट आवश्यक असणार आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. या नियमाचे उल्लंघन केल्यास गंभीर नोंद घेण्यात येईल असे ऑर्डर मध्ये नमूद केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply