पुण्यात धुवाधार पाऊस, रस्त्यांवर पाण्याचे लोंढे ;अंबिल ओढा परिसरात पुन्हा पूरसदृश्य स्थिती

पुणे शहर आणि परिसरामध्ये रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास झालेल्या धुवाधार पावसाने शहरात अक्षरश: धुमाकूळ घातला. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाण्याचे लोंढे आले, तर अंबिल ओढा परिसरात पुन्हा पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचे प्रकार घडले. यापूर्वी अंबिल ओढा भागांत २५ सप्टेंबर २०१९ मध्ये महापूर येऊन हाहाकार निर्माण झाला होता.

पुणे शहर आणि परिसरामध्ये रविवारी दुपारपर्यंत आकाश निरभ्र होते. मात्र, चारनंतर आकाशात ढग निर्माण झाले. त्यानंतर तासभरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही वेळातच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला होता. पावसाचा जोर कमी झाल्यानंतरही रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहत होते. या पाण्यातून वाहने बाहेर काढणेही कठीण झाले होते. अंबिल ओढ्याच्या परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार घडले. इंदिरानगर भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाण्याचे लोट आल्याने दुचाकीसारखी वाहने वाहून जाण्याची स्थिती निर्माण झाली होती. या भागात अंकुश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना मदत केली. काहींची वाहने पाण्याच्या लोंढ्यातून बाहेर काढली, तर ज्येष्ठांना पाण्यातून पुढे जाण्यास मदत केली.
रात्री पर्वती, धनकवडी, के. के. मार्केट परिसर, इंदिरानगर, चंदननगर पोलीस स्थानक, कोथरूडमधील वेधभवन, वनाज, पाषाण, बी. टी. कवडे रस्ता, सोमेश्वरवाडी, वानवडी, कात्रज उद्यान आदी भागांत पाणी शिरण्याचे प्रकार घडले. अंबिल ओढा भागामध्ये २५ सप्टेंबर २०१९ मध्ये महापूर आला होता. त्यात शेकडो वाहने वाहून केली, तर काही लोकांचा बळीही गेला होता



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply