पुण्यात उन्हाचा वाढता कडाका; तापमानाने गाठला उच्चांक

पुणे: काल-परवा पर्यंत अवकाळी पावसाची अनुभूती घेणाऱ्या पुणेकरांना (Pune Weather) आता असह्य उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानात (Temperature in Pune) १.२ अंशांनी वाढ झाली आहे. बुधवारी पुण्यात ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर कोरेगाव पार्क येथे सर्वाधिक म्हणजे तब्बल ४३.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. याशिवाय जिल्ह्यातील ढमढेरे येथे ४४.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

शहरासह संपूर्ण पुणे जिल्ह्यातच बुधवारी पारा चाळीशी पार राहिला आहे. त्यामुळे पुणेकरांना आठवडाभर उकाड्याचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, पुढील आठवडाभर तरी आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच एप्रिल महिन्या अखेर हा पारा चाळीशीपार राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना उन्हाच्या झळांची तीव्रता अधिक जाणवणार असून, नागरिकांनी बाहेर पडताना उन्हाच्या दृष्टीने आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील सर्वाधिक कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

- ढमढेरे : ४४.१

- शिरूर : ४३.९

- कोरेगाव पार्क : ४३.९

- बालेवाडी : ४३.३

- चिंचवड : ४२.६



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply