पुण्यातील सदगुरू सेवा प्रतिष्ठानच्यावतीने २० ग्रंथालयांना तीन हजार पुस्तके भेट

पुणे : जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुण्यातील सदगुरू सेवा प्रतिष्ठानच्यावतीने राज्यातील ग्रामीण भागातील विनाअनुदानित, अल्प ग्रंथ संख्या असणाऱ्या २० सार्वजनिक ग्रंथालयांना शनिवारी (ता.२३) मोफत तीन हजार पुस्तके भेट देण्यात आली.महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या कार्यक्रमात ही पुस्तके वितरित करण्यात आली. यावेळी बुक क्लबचे संस्थापक अविनाश निमसे, विश्व जनकल्याण समितीच्या संस्थापिका छाया भगत, मेनका प्रकाशनचे व्यवस्थापक समीर खळदकर आदी उपस्थित होते.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील गावामध्ये वाचन चळवळ पोचवणे गरजेचे असून भावी भारताचा सुजाण नागरिक घडवणे ही काळाची गरज असल्याचे मत शेखर मुंदडा यांनी यावेळी व्यक्त केले. महाएनजिओ फेडरेशनच्यावतीने येत्या महिनाभरात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा वाचनालय स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. या कार्यक्रमाला महाएनजिओचे संचालक मुकुंद शिंदे, सदगुरू सेवा प्रतिष्ठानचे सचिन म्हसे, युवकमित्र परिवारचे प्रवीण महाजन, ज्ञानज्योती ऑर्गनायझेशनचे नरेंद्र उमाळे, अमर चव्हाण, स्टुडंट हेल्पिंग हँड संस्थेचे कुलदीप आंबेकर, संतोष बळवंत,कार्तिक चव्हाण, राधा लाटे यांच्यासह राज्यातील वाचनालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply