पुण्यातील लोहगाव परिसरात टोळक्याकडून गोळीबार; शहरात गोळीबाराची दुसरी घटना

पुणे : लोहगाव भागात दहशत माजविण्यासाठी टोळक्याने गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. टोळक्याने पिस्तुलातून हवेत तीन गोळ्या झाडल्या. कोरगाव पार्क भागात वैमनस्यातून एका तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती. याप्रकरणी नितीन सकट (वय २१), गणेश राखपसरे (वय २१, दोघे रा. राखपसरे वस्ती, लोहगाव) यांच्यासह साथीदारांच्या विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) रात्री आरोपी सकट, राखपसरे आणि साथीदार दारू प्यायले. त्यानंतर आराेपी आणि साथीदार दुचाकीवरुन लोहगावमधील संत तुकारम चौकात आले. सकट याने त्याच्याकडील पिस्तूल काढले. त्याने नागरिकांना धमकावले. आम्ही या परिसरातील भाई आहोत. आमच्या नादी लागू नका. एकेकाला गोळ्या घालू, अशी धमकी देऊन सकटने त्याच्याकडील पिस्तुलातून हवेत गोळी झाडली. त्यानंतंर आरोपी दुचाकीवरुन लोहगावमधील गणपती चौकात गेले. तेथे दहशत माजवून सकटने पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply