पुणे : ॲड. गुणरत्न सदावर्ते पुण्यात येताच मराठा समाज आक्रमक; जोरदार घोषणाबाजी

पुणे: एसटी कामगार संघटनेच्या आंदोलनात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची आज सलग दुसऱ्या दिवशी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका गुन्ह्यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, या वेळी मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. सदावर्ते यांना न्यायालयाने जामीन दिला असला तरी राज्यामध्ये विविध ठिकाणी त्यांच्याविरोधामध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. आज पुण्यात पोलीस चौकशीसाठी आल्यानंतर त्यांना मराठा समाजाने विरोध करण्यात आला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांचा विरोध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी पोलीस स्टेशनच्या बाहेर दाखल झाले होते. सदावर्ते यांनी एका मुलाखतीत छत्रपती शिवरायांच्या वंशजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले आहे. कार्यकर्त्यांनी सदावर्तेंविदरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांची बदनामी केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात २ वर्षांपूर्वी ॲड. सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सदावर्ते यांना काल मंगळवारी दुपारी चौकशीसाठी बोलावून घेतले होते. यानंतर आज पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास चौकशीसाठी बोलावले. सुमारे २ तास चौकशी करण्यात आली आहे.

नंतर सदावर्ते प्रसारमाध्यमांशी न बोलता बाहेर पडले आहे. सदावर्ते हे त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असताना मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर, राजेंद्र कुंजीर यांच्यासह अन्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply