पुणे : ११ तासांनंतर चांदणी चौकामधील वाहतूक दोन्ही बाजूने सुरु

पुण्यातील वाहतुकीला अडथळा असलेला चांदणी चौक हा पूल काल मध्यरात्री रात्री १ वाजता ब्लास्ट करुन पाडण्यात आला. या ब्लास्टमध्ये पूल पुर्णपणे पडला नसल्यामुळे ब्लास्ट केल्यानंतर पुलाचा इतर भाग हा १० जेसीबी मशिन्स लावून पाडण्यात आला.

पूल पाडल्यानंतर त्या ठिकाणचा राडारोडा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. अखेर त्या ठिकाणचा सर्व राडारोड साफ करण्यात आला असून सुमारे ११ तासानंतर पुलाच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

शिवाय वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग दिल्याने वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता पुणे पोलिसांनी सांगितलं आहे. ज्या कंपनीने काम घेतलं होत त्या कंपनीने व्यवस्थित केलं असल्याचा दावा,आमच्या मनासारखे काम झालं असल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कालचा ब्लास्ट यशस्वी झाला असून हे एक चॅलेंज काम होत, हे टीम वर्क आहे आणि तुम्ही रिझल्ट पाहत असून नवीन पुलाच काम ही लवकरच सुरू होईल सर्व प्रशासकीय प्रक्रिया झाल्या आहेत असं पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सांगितलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply