पुणे : हवेलीतील दस्त नोंदणी पूर्ववत करावी ; चंद्रकांत पाटील यांची मागणी

पुणे : कितीही लहान क्षेत्र असले, तरी त्याची दस्त नोंदणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. तरी देखील हवेली तालुक्यातील गुंठेवारी बांधकामांची दस्त नोंदणी होत नसल्याची बाब उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. हवेली तालुक्यात अशाप्रकारची लाखो बांधकामे असून त्यांची दस्त नोंदणी करण्याची मागणी पाटील यांनी या वेळी केली.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री पाटील म्हणाले, ‘गुंठेवारीची नोंदणी होत नसल्याचा विषय गंभीर होत चालला आहे. कितीही लहान क्षेत्र असले, तरी त्याची नोंदणी करण्याबाबत राज्य सरकारने यापूर्वीच आदेश दिले आहेत. जिल्ह्यात अशाप्रकारची लाखो बांधकामे आहेत. या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनी कष्टाचे पैसे गुंतवून सदनिका खरेदी केल्या आहेत. ही बांधकामे पाडून टाकायची का? असे करता येणार नाही. त्यामुळे हवेलीतील दस्त नोंदणीचा विषय मार्गी लावावा.’



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply