पुणे : सिंहगड रस्ता भागात घरफोडी करणारा चोरटा गजाआड; अडीच लाखांचा ऐवज जप्त

पुणे : सिंहगड रस्ता भागात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याकडून घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले असून दोन लाख ५७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.शशिकांत उर्फ बिल्डर अनंत माने (वय २७ रा. कुंजीरवाडी, म्हातोबाची आळंदी, ता. हवेली, मूळ रा. पोलादपूर ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. धायरी भागात काही दिवसांपूर्वी भरदिवसा घरफोडी झाली होती. घरफोडी करणारा चोरटा सिंहगड रस्ता परिसरात थांबल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी देवा चव्हाण आणि सागर शेडगे यांना मिलाली. हिंगणे खुर्द परिसरात सापळा लावून त्याला पकडले.

चौकशीत मानेने सिंहगड रस्ता परिसरात घरफोडीचे चार गुन्हे केल्याचे उघडकीस आले. पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर, सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक गणेश मोकाशी, आबा उत्तेकर, संजय शिंदे, देवा चव्हाण सागर शेडगे, अमित बोडरे, अमोल पाटील आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply