पुणे : सलग दोन दिवस पारा चाळीशीपार

पुणे - शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून काही भागात कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार नोंदला जात आहे. बुधवारी (ता. ६) आणि गुरुवारी (ता. ७) या दोन्ही दिवस शहरात ४०.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान नोंदले गेले. या पूर्वी २०२० मध्ये १७ एप्रिल रोजी इतक्याच उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती.

 

शहर आणि परिसरात कमाल आणि किमान तापमानाचा पारा झपाट्याने वाढू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात तापमान ४० अंशांच्या घरात आणि किमान तापमान २१ अंशांच्या पुढे नोंदला जात आहे. साधारणपणे एप्रिलच्‍या अखेरपर्यंत पारा ४० पर्यंत नोंदला गेला आहे. . येत्या बुधवारपर्यंत (ता. १३) ही स्थिती अशीच कायम राहणार असून पुणे व परिसरात कमाल तापमानाचा पारा चाळिशी पार कायम राहणार आहे. तर पिंपरी चिंचवड येथे ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पारा पोहचण्याची शक्यता आहे.

पुण्यातील कमाल व किमान तापमान

(अंश सेल्सिअसमध्ये)

ठिकाण = कमाल- किमान

शिवाजीनगर- ४०.१ , २१.३

लोहगाव -४०.२,  २३.६

चिंचवड -४२,  २५

लवळे -४१.१,  २३.४

मगरपट्टा -४१,  २५.९

पाषाण - ४०.६, १९.८



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply