पुणे : समाजमाध्यमावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने एकावर शस्त्राने वार, मार्केट यार्डातील घटना

पुणे : प्रतिस्पर्धी गटातील एकास समाजमाध्यमावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन दहशत माजविण्यात आल्याची घटना मार्केट यार्ड भागात घडली. या प्रकरणी फहिम फिरोज शेख (रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोमनाथ अशोक सदाफुले (वय २२, रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदाफुले याचा मित्र काळू घोलप याच्याशी आरोपी शेख याचा वाद झाला होता.

घोलप याच्या वाढदिवसानिमित्त सदाफुले याने समाजमाध्मयावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या कारणावरुन शेख सदाफुले याच्यावर चिडला होता. शेख याने सदाफुलेला शिवीगाळ करुन त्याच्यावर कोयत्याने वार केले. मी आंबेडकरनगरचा दादा आहे, अशी धमकी देऊन त्याने परिसरात दहशत माजविली. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखविला. पोलीस उपनिरीक्षक मदन कांबळे तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply