पुणे : समाजमाध्यमांचा वापर करुन अमली पदार्थांची विक्री; पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात दोन युवकांना अटक

पुणे : समाजमाध्यमांचा वापर करुन अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून एक लाख ३६ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. आकाश महेंद्र ठाकर (वय २२, रा. सनसिटी, सिंहगड रस्ता), अनिकेत जनार्दन धांडेकर (वय २०, रा. आनंद विहार काॅलनी, सिंहगड रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ठाकर, धांडेकर हे समाजमाध्यमांचा वापर करुन अमली पदार्थ विक्री करत होते.

सिंहगड रस्ता परिसरात दोघे अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून मेफेड्रोन (एमडी), चरस असे एक लाख ३६ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच मोबाइल संच आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, सुजीत वाडेकर, मनोज साळुंके, विशाल दळवी, पांडुरंग पवार, राहुल जोशी आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply