पुणे : शिवाजीनगर येथे रेकॉर्डरूमला लागलेल्या आगीत महत्वाची कागदपत्रे खाक

पुण्यात शिवाजीनगर येथील महापालिका इमारतीच्या शेजारी व्यावसायिक इमारतीतील तळमजल्यावर लागलेल्या आगीत महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहचून आग विझवल्याने काही कागदपत्रे वाचली. यावेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी सांगितले की, “शिवाजीनगर येथील महापालिका इमारतीच्या शेजारी बी यू भंडारी शोरूमबाहेर एका व्यावसायिक इमारतीतील तळमजल्यावर आग लागल्याचा संदेश अग्निशमन दलाला पहाटे पाच वाजता मिळाला होता. तेथे गेल्यानंतर तळमजल्यावर असणाऱ्या रेकॉर्डरूमला आग लागली होती”.

“तीन हजार चौरस फुटात ही रेकॉर्डरूम आहे. जयेश शहा यांच्या मालकीची ती इमारत आहे. त्यांची विद्युत मोटर म्हणून कंपनी होती. ती बंद झाल्यानंतर कागदपत्रे या तळमजल्यावरील रेकॉर्डरूममध्ये ठेवली होती. तेथे गेल्यानंतर पहिले तर खूप मोठया प्रमाणावर धूर झाला होता. आग मोठी असल्याने मुख्य अग्निशमन केंद्रातून एक बंब, टँकर मागविण्यात आले. धूर मोठया प्रमाणावर असल्याने तो बाहेर काढून पाण्याचा मारा करून आग अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. एका तासात आग विझवण्यात यश आले”, अशी माहिती त्यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply