पुणे : शिवसेना कार्यालयावर गोळीबार; "यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे,"

पुण्यातील वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर टोळक्याकडून गोळीबाराचा धक्कादायक प्रकार घडला. ‘यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे," असं म्हणत गोळीबार करण्यात आला आहे.

शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर गोळीबार झाला आहे. पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:ला भाई म्हणविणार्‍याने हातात पिस्तुल घेऊन हवेत गोळीबार केल्याचा प्रकार घडला.

मुख्य रस्त्यावर येऊन हातात पिस्तुल घेऊन यातील एकाने ‘यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे," असे बोलून पिस्तुलातून फायरिंग करुन दहशत निर्माण केली. अतिक शेख, सादिक शेख, हुसेन कादिरी अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे ओळखीचे आहेत. फिर्यादीचा भाऊ इम्रान व सादीक शेख याचा भाऊ शब्बीर कादरी यांच्यात २७ डिसेंबरला भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरुन अतिक व इतर दुचाकीवरुन सय्यदनगर येथील गल्ली नं २२ मधील कार्यालयात आले़ कार्यालयात कोणी नसताना त्यावर लाथांनी मारुन मुख्य रस्त्यावर येऊन अतिक याने हातात पिस्तुल घेऊन ‘यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे,’ असे बोलून पिस्तुलातून गोळीबार करुन दहशत निर्माण केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संदिप जनशिवले तपास करीत आहेत



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *