पुणे : शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुणे: शाळांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणा, तसेच वर्गाबाहेर विद्यार्थ्यांवर देखरेख न ठेवणे यामुळे शाळांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे वास्तव आहे. परिणामी, याचे पडसाद विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर उमटत असल्याचे दिसून येत आहे. अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या असुरक्षिततेबाबत पालकांकडून नाराजीचा सूर उमटत आहे.

शालेय अध्ययनाबरोबरच वर्गाबाहेर विद्यार्थी पिण्याच्या पाण्याची टाकी, स्वच्छतागृह, क्रीडांगण अशा विविध ठिकाणी वावरत असतात. अशा सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांवर देखरेख ठेवणे, विशेषत: क्रीडांगणावर विद्यार्थी असताना त्याठिकाणी एखादा तरी शिक्षक उपस्थित असणे आवश्यक आहे. मात्र, सुरक्षिततेबाबत पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply