पुणे शहरात जोरदार पावसाने 13 ठिकाणी झाडपडीच्या घटना, वाहतूक कोंडीने पुणेकर नागरिक त्रस्त

पुणे : पुणे शहर आणि धरण क्षेत्रात कालपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणेकर नागरिकांवरील दिवसाआड पाण्याच संकट दूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर आज सकाळपासून देखील शहरातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच मागील पाच तासात शहरात तब्बल 13 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने, पुणेकर नागरिकांना नाहक वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले आहे.

दत्तवाडी पोलीस चौकीजवळ,शिवणे शिंदे पुल, टिंगरेनगर, गल्ली क्रमांक 6, लुल्लानगर,भवानी पेठ, मनपा वसाहत क्र 10, औंध, आंबेडकर चौक, प्रभात रोड, लेन नं 14, नवीन सर्किट हाऊस, नाना पेठ, अशोका चौक,कळसगाव, जाधव वस्ती,हडपसर, क्वालिटी बेकरीजवळ,कोथरुड, मयुर कॉलनी आणि, गुळवणी महाराज रस्ता या 13 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.त्याच दरम्यान एका ठिकाणी आगीची घटना घडली आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले असल्याचे अग्निशामक विभागा मार्फत सांगण्यात आले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply