पुणे :शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ:पाच ठिकाणी घरफोड्या; रोकड, दागिने लांबविले

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी बंद सदनिकांचे कुलुप तोडून रोकड तसेच दागिने असा ऐवज लांबविला.दत्तवाडी भागातील लक्ष्मीनगर सोसायटीतील रहिवासी महादेव वसंत भोसले (वय ४२) यांच्या सदनिकेचे कुलुप चोरट्यांनी तोडले. कपाटातील रोकड, दाागिने असा एक लाख चार हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला. भोसले यांनी याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरात सुनील गोपीनाथ गवळी (वय ३८) यांच्या घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी रोकड आणि कपाटातील चांदीचे पैंजण लांबविले. गवळी यांनी या संदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वडगाव बुद्रुक भागातील जाधवनगर येथील रहिवासी पांडुरंग गंगाराम भालेकर (वय ६६) यांच्या घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविले. जाधव यांचे शेजारी अनंत वणगे यांच्या घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. वणगे यांच्या घरातून नेमका किती ऐवज चोरीस गेला, याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

हडपसर भागातील त्रिमूर्ती सोसायटीतील सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील दागिने आणि रोकड असा ४५ हजारांचा ऐवज लांबविला. याबाबत अमोघ प्रमोद रुपनर (वय २७) यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply