पुणे : शहरातील बेकायदा गुटखा विक्रीवर कारवाईची मागणी; मनसेकडून पोलीस आयुक्तांना निवेदन

पुणे : शहरात बेकायदा गुटखा विक्री सुरू असून गुटखा विक्री आणि साठा करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केली आहे. याबाबत मनसेकडून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना बुधवारी निवेदन देण्यात आले.

शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा विक्री करण्यात येत आहे. शासनाने गुटखा विक्री तसेच साठा करण्यावर बंदी घातली आहे. शहरातील किराणा माल विक्री दुकाने, पानटपऱ्या, चहा टपऱ्यांवर बेकायदा गुटखा विक्री सुरू आहे. बेकायदा गुटखा विक्री तसेच साठा करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. पोलीस त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, असे मनसेचे नेते राजेंद्र तथा बाबू वागसकर आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी निवेदनात म्हटले आहे.

वागसकर आणि बाबर यांनी बुधवारी पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची पोलीस आयुक्तालयात भेट घेतली. शहरातील बेकायदा विक्री, गुटख्याचा साठा करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply